पी. एम. पी. प्रवासी मित्रांनो संघटीत व्हा, आवाज उठवा ! – पुणे बस प्रवासी संघ

पी.एम.पी.चा खुळखुळा

 • अजुन किती दिवस पी.एम.पी. बसमधे गुरासारखे कोंबले जाणार ?
 • रोजचे तासंतास वाट बघणे किती काळ सहन करणार ?
 • बंद पडलेल्या पी.एम.पी. बसला किती वेळा धक्के मारणार ?
 • नादुरूस्त पी.एम.पी. बसखाली अजुन किती बळी जाणार ?
 • महागडे भाडे देऊन  पी.एम.पी.चा हा त्रास अजुन किती वर्ष सहन करणार ?
 • आपण फुकट प्रवास करत नाही : वेळेवर बस, बसायला जागा, सुस्थितीतील बस, आणि कमी तिकीटदर हा आपला हक्क आहे !

पी. एम. पी. ची दुरावस्था

 • ५० लाख लोकसंखेच्या पुण्यात हव्यात २००० बसेस, पण मग फक्त ८५०च उपलब्ध का ?
 • महापालिकेकडे शेकडो कोटींचे उड्डाणपूल बांधायला पैसे आहेत, मात्र २० लाखांची बस घ्यायला पैसे नाहीत ?
 • भरमसाठ वाढवलेले भाडे, आणि बसमधे ही गर्दी ! पी. एम. पी. चे पैसे जातात तरी कोठे?
 • पुण्याच्या प्रत्येक भागात पी.एम.पी बसेस का जात नाहीत. जातात तेथे फार कमी वेळा का जातात ?
 • मुंबईची “बेस्ट” जर नीट चालू शकते, तर पूण्याची पी.एम.पी. का नाही नीट चालू शकत ?
 • आता तर जी काही पी.एम.पी. सोय उपलब्ध आहे,, प्रशासनाने तिच्या खाजगीकरणाचा घाट घातला आहे !

पी.एम.पी. ची दुरावस्था हे पुण्याच्या वाहतूक समस्येचे मूळ कारण

पी.एम.पी. ने जाण्यामधे एवढा वेळ खर्च होतो की शेवटी ज्यांना परवडते ते दुचाकी किंवा मोटारी विकत घेतात. पुण्यात आज जवळपास १६ लाख खाजगी वाहने आहेत, आणि दरवर्षी २ लाख नवीन वाहने येतात. मुंबईपेक्षाही जास्त वाहने आज पुण्यात आहेत ! हा खाजगी वाहनांचा भस्मासूर भयानक बोकाळला आहे  कारण लोकांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्यायच उपलब्ध नाही.

जागतिकीकरणाच्या एकंदरीत धोरणांमधेच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन, मोटारींवरील जकात कमी करणे, मोठेमोठे महामार्ग व उड्डाणपूल बांधणे समाविष्ट आहे. म्हणूनच जाणीवपूर्वक सार्वजनिक वाहतुकीची हेळसांड केली जात आहे आणि खाजगी वाहनांना विविध सुविधा पुरवल्या जात आहेत.

Read more of this post