पी. एम. पी. प्रवासी मित्रांनो संघटीत व्हा, आवाज उठवा ! – पुणे बस प्रवासी संघ

पी.एम.पी.चा खुळखुळा

 • अजुन किती दिवस पी.एम.पी. बसमधे गुरासारखे कोंबले जाणार ?
 • रोजचे तासंतास वाट बघणे किती काळ सहन करणार ?
 • बंद पडलेल्या पी.एम.पी. बसला किती वेळा धक्के मारणार ?
 • नादुरूस्त पी.एम.पी. बसखाली अजुन किती बळी जाणार ?
 • महागडे भाडे देऊन  पी.एम.पी.चा हा त्रास अजुन किती वर्ष सहन करणार ?
 • आपण फुकट प्रवास करत नाही : वेळेवर बस, बसायला जागा, सुस्थितीतील बस, आणि कमी तिकीटदर हा आपला हक्क आहे !

पी. एम. पी. ची दुरावस्था

 • ५० लाख लोकसंखेच्या पुण्यात हव्यात २००० बसेस, पण मग फक्त ८५०च उपलब्ध का ?
 • महापालिकेकडे शेकडो कोटींचे उड्डाणपूल बांधायला पैसे आहेत, मात्र २० लाखांची बस घ्यायला पैसे नाहीत ?
 • भरमसाठ वाढवलेले भाडे, आणि बसमधे ही गर्दी ! पी. एम. पी. चे पैसे जातात तरी कोठे?
 • पुण्याच्या प्रत्येक भागात पी.एम.पी बसेस का जात नाहीत. जातात तेथे फार कमी वेळा का जातात ?
 • मुंबईची “बेस्ट” जर नीट चालू शकते, तर पूण्याची पी.एम.पी. का नाही नीट चालू शकत ?
 • आता तर जी काही पी.एम.पी. सोय उपलब्ध आहे,, प्रशासनाने तिच्या खाजगीकरणाचा घाट घातला आहे !

पी.एम.पी. ची दुरावस्था हे पुण्याच्या वाहतूक समस्येचे मूळ कारण

पी.एम.पी. ने जाण्यामधे एवढा वेळ खर्च होतो की शेवटी ज्यांना परवडते ते दुचाकी किंवा मोटारी विकत घेतात. पुण्यात आज जवळपास १६ लाख खाजगी वाहने आहेत, आणि दरवर्षी २ लाख नवीन वाहने येतात. मुंबईपेक्षाही जास्त वाहने आज पुण्यात आहेत ! हा खाजगी वाहनांचा भस्मासूर भयानक बोकाळला आहे  कारण लोकांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्यायच उपलब्ध नाही.

जागतिकीकरणाच्या एकंदरीत धोरणांमधेच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन, मोटारींवरील जकात कमी करणे, मोठेमोठे महामार्ग व उड्डाणपूल बांधणे समाविष्ट आहे. म्हणूनच जाणीवपूर्वक सार्वजनिक वाहतुकीची हेळसांड केली जात आहे आणि खाजगी वाहनांना विविध सुविधा पुरवल्या जात आहेत.

या अशा अर्निबंध वाहनवाढीमुळेच एकेकाळी शुद्ध हवेचे, हरीत पुणे आज आशियातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. दररोज खाजगी वाहनांच्या अपघातात सरासरी १ बळी जातो. हा विकास (?) असाच चालू राहीला तर हे शहर जगण्यायोग्य राहणार नाही.

गेली अनेक वर्ष जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेली बस व्यवस्था हे पुण्याच्या वाहतूक समस्येचे मुख्य कारण आहे. त्यामुळेच सार्वजनिक बस व्यवस्था सुधारणे ही पुण्याची वाह्तूक समस्या सोडवण्याची पहिली पायरी ठरते.

मागण्या

 • बसेसची संख्या २००० करावी
 • बसेस सुस्थितीत असाव्यात
 • बसचे भाडे कमी करावे
 • वेळापत्रक शास्त्रशुध्द पध्दतीने आखले जावे
 • शहरातील खाजगी वाहनांवर आळा घालण्यासाठी मोटारींवर गर्दीकर लावावा व त्यातून येणारा पैसा पी.एम.पी. करीता वापरावा

प्रवाशांनो आता गप्प बसू नका !

दररोज प्रवास करणारे ५ लाख प्रवासी गप्प आहेत, म्हणून हे सगळे बिनबोभाट चालू आहे. प्रवासी मित्रांनो, आपण अजुनही गप्प बसणार आहोत का? हे गुरांढोरासारखे वागवले जाणे अजुनही सहन करणार का ? आपण प्रवाशांनी एकत्र आल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत !

आम्ही सर्व बस प्रवाशांना एकत्र आणण्याकरीता “पुणे बस प्रवासी संघ” स्थापन करत आहोत. आपण आपल्याच प्रश्नांच्या सोडवणुकीकरीता टाकलेले हे पहिले पाऊल आहे ! सर्व प्रवासी मित्रांना आवाहन आहे, की त्यांनी प्रवासी संघात सामील व्हावे, व आपल्या या रोजच्या प्रश्नांविरूद्ध आवाज उठवावा.

पुणे वाचवा समिती

-: संपर्क पत्ता :-

लोकायत ऑफीस, सिंडीकेट बँकेसमोर, लॉ कॉलेज रस्ता, नळस्टॉप जवळ, पुणे – ४

(दर रविवारी या पत्यावर सायंकाळी ४ ते ७ या वेळात मिटींग होते)

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: